Ai म्हणजे काय? (What is Ai in Marathi) – २०२६ मध्ये AI बद्दल सर्व काही सोप्या भाषेत

Ai म्हणजे काय ? What is AI ? Ai मतलब क्या ? अशा अनेक भाषांमध्ये असे प्रश्न लाखों लोकं Google वर सर्च करत असतात. पण नेमकं Ai म्हणजे नक्की काय? हे बऱ्याच लोकांना अजूनही पूर्णपणे समजलेलं नाही. 

कारण Ai हा विषय थोडा टेक्निकल आणि अवघड वाटतो. म्हणून काही गोष्टी लोकांच्या डोक्यावरून जातात.

म्हणून या आजच्या ह्या लेखमध्ये Ai म्हणजे काय ? हे तुम्हाला अगदी आपल्या सोप्या मराठी भाषेत तुम्हाला कळणार आहे.

या Ai ची ताकद दिवसेंदिवस वाढत चालली आहे. तुम्ही ज्या मोबाइल वर किवा लॅपटॉप वर हे लेख वाचता आहेत ना त्यामध्ये सुद्धा Ai आहे. आजकाल बऱ्याच लोकांना अशी गैरसमज झाला आहे की AI म्हणजे फक्त ChatGPT नाहीतर Gemini.

पण Ai चे महत्त्व एवढेच नाही आहे. Chatgpt Gemini हे तर फक्त AI चे टूल्स आहे. हे तर Ai च्या पिक्चरचा ट्रेलर सुद्धा नाही आहे. मग पूर्ण पिक्चर तर खूप लांबची गोष्ट आहे.

Ai बद्दल लोकं खूप काही गूगल वर सर्च करत असतात लोकांच्या मनात खूप प्रश्न आहेत.

जसे त्यातील काही प्रश्न – AI चे कोणकोणते प्रकार आहेत?, २०२६ मध्ये सर्वात भारी आणि फ्री AI टूल्स कोणता आहे, AI च्या मदतीने आपण काय काय करू शकतो?, AI च्या मदतीने आपण पैसे कमवू शकतो का?, भविष्यात एआयमुळे नोकऱ्या जाणार का? आणि AI मुळे होणारे फायदे आणि नुकसान कोणते ?

या सगळ्या प्रश्नांची उत्तर सोप्या भाषेत या लेख मध्ये तुम्हाला मिळणार आहे एवढेच नव्हे तर मी माझा स्वतचा अनुभव पण तुमच्या सोबत शेअर करणार आहे.

त्यामुळे जर तुम्हाला Ai बद्दल A टू Z सर्व काही जाणून घ्यायचे असेल तर हा लेख शेवट पर्यंत नक्की वाचा.

Ai म्हणजे नक्की काय? (What is Ai in Marathi)

AI चा फुल फॉर्म आहे Artificial Intelligence. मराठीमध्ये याचा अर्थ होतो—कृत्रिम बुद्धिमत्ता.

हे नाव ऐकल्यावरच काही लोकांना घाम फुटतो! त्यांना वाटतं की हा विषय खूप अवघड आहे.

पण या शब्दाचा सोपा अर्थ असा आहे की—’कृत्रिम’ म्हणजे आपल्यासारख्या मानवाने तयार केलेली कोणतीही वस्तू आणि ‘बुद्धिमत्ता’ म्हणजे समजून घेण्याची, विचार करण्याची आणि अचूक निर्णय घेण्याची क्षमता.

म्हणजेच, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) ही मानवाने तयार केलेली एक अशी सिस्टम आहे, जी मानवांसारख्या गोष्टी समजून घेते, त्यावर विचार करते आणि योग्य तो निर्णय घेते. एवढा सरळ, सोपा आणि साधा विषय आहे हा!

पण हा AI एवढा हुशार कसा होतो?
तुम्हाला वाटत असेल की आपण एखादी चूक ChatGPT किंवा Gemini ला सांगितली की तो लगेच सुधारतो, तर तसं नाहीये. जेव्हा आपल्यासारखे करोडो लोक त्याला फीडबॅक देतात, तेव्हा ती सगळी माहिती गोळा केली जाते.

मग त्या कंपनीचे इंजिनिअर्स त्याला पुन्हा ट्रेनिंग देतात आणि पुढच्या अपडेटमध्ये तो अजून पावरफुल होऊन बाहेर येतो. अशा प्रकारे तो आपल्या सर्वांकडून हळूहळू शिकत असतो. यालाच टेक्निकल भाषेत मशीन लर्निंग म्हणतात.

जरा आठवा बरं… तुम्ही जेव्हा युट्युब किंवा Instagram बघता, तेव्हा तुम्हाला आवडणारे व्हिडिओज तुम्हाला अगोदर दिसतात, नाही का? किंवा गुगल मॅपमध्ये ट्रॅफिक कुठे आहे आणि शॉर्टकट कोणता, हे कोण सांगतो?

हे सगळं त्यामध्ये लपलेला AI करत असतो. म्हणजेच, AI  तुमच्या आवडीनिवडी ओळखतो.

पण २०२६ मध्ये AI फक्त चॅटपुरता उरला नाहीये!
आताचा AI फक्त बोलत नाही, तर तो बघू शकतो, ऐकू शकतो आणि आपल्यासारखा संवादही साधू शकतो.

इतकंच काय, आता असे AI आलेत जे तुमची कामं स्वतःहून पूर्ण करतात. जसं की, तुम्हाला कुठेतरी जायचं असेल तर तो स्वतःहून तिकीट बुक करेल किंवा तुमचा ईमेल ड्राफ्ट करून पाठवूनही देईल.

थोडक्यात सांगायचे झाले तर, AI एक अशी सिस्टिम आहे ज्यामध्ये आपण ऑनलाइन कोणतीही कामे चुटकी वाजवून करू शकतो. आपलं काम सोपं व्हावं, म्हणूनच हा AI जन्माला आला आहे.

2026 मध्ये Ai चे कोणकोणते प्रकार आहेत?

चला, आता बघूया Ai चे प्रकार नक्की कोणते कोणते आहेत ते.

तसं पाहायला गेलं तर पुस्तकी भाषेत Ai चे Narrow, General आणि Super असे तीन मुख्य प्रकार आहेत. पण हे प्रकार खूप टेक्निकल आहेत, जे कदाचित तुम्हाला पटकन समजणार नाहीत.

आणि तसंही आपण सर्व सामान्य माणसं आहोत, आपल्याला कामाची माहिती हवी असते.

म्हणून मी तुम्हाला Ai चे असे ४ प्रकार सांगणार आहे, जे आपण २०२६ मध्ये प्रॅक्टिकली वापरत आहोत आणि ज्याचा फायदा आपल्याला रोजच्या आयुष्यात होतोय.

Ai चे चार प्रॅक्टिकल प्रकार:

१. Generative AI (काहीतरी नवीन बनवणारा Ai):
या प्रकारामध्ये असे Ai येतात जे काहीतरी नवीन ‘तयार’ करतात, यांच्यामध्ये क्रिएटिव्हिटी जास्त असते. जसे की ChatGPT, Gemini, Leonardo, Grok यांसारखे Ai टूल्स. हे तुमच्यासाठी इमेज किंवा व्हिडिओ बनवतात आणि काहीतरी भन्नाट क्रिएटिव्ह आयडिया सुद्धा देतात.

२. Ai Agents (स्वतः काम करणारा स्मार्ट नोकर):
२०२६ मधला हा सर्वात मोठा बदल आहे! असे काही Ai असतात जे तुमची कामं प्रत्यक्षात पूर्ण करतात. उदाहरणार्थ—तुमचं प्रवासाचं तिकीट बुक करणे किंवा हॉटेल बुकिंग करणे. यालाच ‘एआय एजंट’ म्हणतात, जे आता तुमच्या ब्राउझरमध्ये किंवा फोनमध्येच उपलब्ध असतात.

३. On-device Ai (तुमच्या मोबाईलमध्ये असणारा Ai):
आता प्रत्येक मोबाईल, लॅपटॉप म्हणजेच इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसमध्ये कंपन्यांकडूनच Ai दिला जातो. तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल, पण आता इंटरनेट नसतानाही तुम्ही या Ai चा वापर करून फोटो एडिट करू शकता किंवा तुमची कामं सोपी करू शकता.

४. Voice & Audio Ai (कोणाचाही आवाज जनरेट करणारा Ai):
आजकाल असे Ai टूल्स आले आहेत, जे कोणाचाही हुबेहूब आवाज जनरेट करू शकतात. तुम्ही Pocket FM किंवा Kuku FM सारख्या ॲप्सवर पाहिलं असेलच, त्यामध्ये खूप साऱ्या स्टोरीजमधील आवाज आता Ai च्या मदतीने तयार केले जातात.

2026 मधील सर्वात भारी आणि फ्री टूल्स

इंटरनेटवर शेकडो असे AI टूल्स आहेत. पण आजकाल सर्वांना सर्वात चांगले आणि ‘फ्री’ AI टूल्स हवे असतात. मला माहितीये तुम्हालाही ते हवे असतील!

म्हणूनच मी इंटरनेटवर खूप रिसर्च केला आहे आणि तुमच्यासाठी सर्वात बेस्ट Free AI Tools शोधून काढले आहेत. ते खालीलप्रमाणे आहेत:

१. Perplexity AI:
हा AI टूल फ्री आहे. या टूलवर जाऊन तुम्ही कोणताही प्रश्न विचारा, हा टूल इंटरनेटवरून डायरेक्ट तुम्हाला अचूक उत्तर देईल. हे एक प्रकारचे ‘AI सर्च इंजिन’ आहे, जे सरळ सरळ गुगलला टक्कर देतं.

कोणतेही उत्तर देताना हा टूल कोणत्या वेबसाईटवरून माहिती घेतली आहे, त्याचं नाव (Source) सुद्धा सांगतो. यामध्ये पेड प्लॅन सुद्धा आहे, पण फ्री प्लॅनमध्येही तुम्ही बऱ्याच गोष्टी अगदी फुकट करू शकता.

२. Ideogram AI:
२०२६ मध्ये हा AI टूल इंटरनेटवर खूप ट्रेडिंगमध्ये आहे. कारण हा AI टूल फ्रीमध्ये हाय क्वालिटी इमेज जनरेट करून देऊ शकतो. तुम्हाला तुमच्या बिजनेससाठी लोगो बनवायचा असेल, तर याच्यापेक्षा बेस्ट AI टूल दुसरं कोणतंही नाही.

हा ३D इमेजेस बनवण्यासोबतच हिंदी किंवा मराठी टेक्स्ट (Text) सुद्धा एकदम बरोबर जनरेट करतो. याला क्रेडिट लिमिट आहे, पण ती संपण्याआधी तुम्ही कितीतरी भारी इमेजेस बनवू शकता.

३. Luma Dream Machine:
हा AI टूल सुद्धा सध्या इंटरनेटवर खूप गाजत आहे. हा टूल तुम्हाला हाय क्वालिटी व्हिडिओज बनवून देतो. व्हिडिओ जनरेशन टूल्समध्ये सर्वात जास्त गुगलवर सर्च होणारा हा टूल आहे.

तुमच्याकडे एखादा साधा फोटो जरी असला, तरी तुम्ही इथे त्या फोटोचा ५ सेकंदाचा एकदम रिअल व्हिडिओ फ्रीमध्ये बनवू शकता.

४. ChatGPT आणि Gemini:
हे दोन्ही टूल्स तर आपल्या सर्वांना माहितीच आहेत. हे आपल्या रोजच्या कामाचे खरे साथीदार आहेत—जसे की ईमेल लिहिणे किंवा ऑफिसची कामे करणे.

आजच्या तारखेला हे टूल्स खूप अपडेट झाले आहेत. या दोन्ही टूल्समध्ये आता असे फीचर्स आले आहेत, जे मुलांना एखाद्या शिक्षकाप्रमाणे अभ्यास शिकवू शकतात. आणि जेमिनी (Gemini) मध्ये तर आता असे फीचर आहे, ज्याच्या मदतीने तुम्ही स्वतःचं गाणं सुद्धा बनवू शकता. फक्त गाण्याचे बोल टाकायचे आणि गाणे तयार!

Ai च्या मदतीने आपण काय काय करू शकतो?

हा प्रश्न तर सगळ्या लोकांच्या मनात आहे. Ai हा आता आपल्या दैनंदिन जीवनाचा अत्यंत महत्त्वाचा भाग बनलेला आहे. त्याच्या मदतीने आपण खूप काही गोष्टी करू शकतो.

जसे की, एखाद्या लेखकाला भारी-भारी युनिक आयडिया देऊ शकतो. किंवा एखाद्या ऑफिसला जाणाऱ्या माणसाला त्याच्या ऑफिसच्या कामात पण मदत करू शकतो. अजून खूप काही करू शकतो!

मी आता इथे सगळं सांगत बसलो ना, तर लेख एवढा मोठा होईल की तुम्हाला वाचायला किती दिवस लागतील हे मी सांगू शकत नाही.

अगदी तुम्ही Ai च्या मदतीने घरबसल्या पैसे सुद्धा कमवू शकता. आज कितीतरी लोक आहेत जे घरबसल्या Ai च्या मदतीने (उदा. कंटेंट लिहून किंवा डिझाइनिंग करून) पैसे कमवत आहेत.

एवढेच नव्हे, तर एखाद्या विद्यार्थ्याला मित्राच्या किंवा शिक्षकाच्या स्वरूपात तो पूर्ण अभ्यास शिकवेल. गृहपाठ असो, निबंध असो किंवा एखादा अवघड प्रश्न; तो सोप्या भाषेत समजावून सांगू शकतो. म्हणजेच, Ai आता तुमचा ‘स्मार्ट टीचर’ सुद्धा बनेल.

अरे, तुम्ही Ai च्या मदतीने एखादं ॲप पण बनवू शकता, ते पण काही मिनिटांमध्ये!

एखादा प्रॉब्लेम सुटत नसेल, तर Ai ला सांगा, तो लगेच सोल्युशन सुद्धा देईल. समजा जर तुमच्या लॅपटॉपमध्ये एखादा ‘एरर’ आला किंवा एखादा सरकारी फॉर्म कसा भरायचा हे समजत नसेल, तर फक्त त्याचा फोटो काढून Ai ला पाठवा; तो तुम्हाला लगेच सोप्या भाषेत स्टेप-बाय-स्टेप सांगेल की नक्की काय आणि कसं करायचं ते.

Ai मुळे आतापर्यंत केवढ्या लोकांचे भविष्य बदलले आहे, हे तुम्हाला माहिती आहे का? नाही नाही, मी आता सगळं सांगत बसणार नाहीये, चला वळूया पुढच्या प्रश्नावर!

सर्वात महत्त्वाची गोष्ट: Ai च्या मदतीने आपण पैसे कमवू शकतो का?

लाखो काय, करोडो लोक गुगलवर हा प्रश्न सर्च करत असतात. कारण आजच्या जगात पैसा सर्वात महत्त्वाचा आहे. आणि जेव्हापासून Ai आला आहे, तेव्हापासून लोकांमध्ये खूप म्हणजे खूप उत्सुकता आहे की, “आम्ही Ai ने ऑनलाईन पैसे कसे कमवू?” आणि “खरंच कमवू शकतो का?”

याचं एकदम सरळ उत्तर आहे: होय, शंभर टक्के तुम्ही पैसे कमवू शकता!

पण सर्वात आधी एक गोष्ट लक्षात ठेवा की, Ai स्वतःहून पैसे देत नाही, तर Ai च्या मदतीने आपण पैसे कमवू शकतो. Ai मुळे पैसे कमावण्याचे खूप सारे मार्ग सोपे झाले आहेत. याचा अर्थ असा नाही की मेहनत करावी लागणार नाही; कष्ट तर करावेच लागतील, पण पूर्वीपेक्षा कमी!

Ai हे एक टूल म्हणजेच एक साधन आहे, प्रत्यक्ष काम तर तुम्हालाच करावं लागेल.

तुम्हाला माहिती आहे का? Zee News च्या एका लेखानुसार, एका विद्यार्थ्याने Ai वापरून स्वतःची वेबसाईट बनवली आणि फक्त दोन महिन्यांत दीड लाख रुपये कमवले!

मला माहितीये तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण हे खरं आहे. तुम्ही सुद्धा असे करू शकता, पण जरा डोकं चालवावं लागेल आणि थोडे कष्ट करावे लागतील.

मी तुम्हाला थोडक्यात सांगतो की Ai च्या मदतीने पैसे कमावण्याचे प्रॅक्टिकल मार्ग नक्की कोणते आहेत:

१. Freelancing (फ्रीलान्सिंग):
पहिले लोकांना डिझाईन करण्यासाठी तासनतास लॅपटॉप किंवा कम्प्युटर समोर बसावं लागत होतं. पण आता Canva AI किंवा Ideogram या Ai टूल्समुळे तुम्ही काही मिनिटांमध्ये कुठलीही डिझाईन करू शकता.

जसे की Business Logo, थंबनेल किंवा सोशल मीडिया पोस्ट. तुम्ही स्वतःची Freelancing प्रोफाईल बनवून या डिझाईन्स लोकांना विकू शकता.

२. युट्युब किंवा Instagram:
तुम्ही ChatGPT किंवा Gemini च्या मदतीने युट्युब व्हिडिओ किंवा इंस्टाग्राम Reel ची भन्नाट अशी स्क्रिप्ट बनवू शकता. आणि भारी इमेजेस सुद्धा जनरेट करू शकता.

Luma Dream Machine किंवा HeyGen सारख्या Ai टूल्सचा वापर करून व्हिडिओ पण बनवू शकता. ते पण स्वतःचा चेहरा न दाखवता आणि स्वतःचा आवाज न वापरता! याच्या मदतीने तुम्ही एखादे युट्युब चॅनेल लगेच सुरू करू शकता.

३. Mini Apps बनवून:
तुम्ही Replit सारख्या टूल्सचा वापर करून काही मिनिटांतच ॲप बनवू शकता. आणि ते ॲप विकू पण शकता किंवा त्या ॲपमध्ये जाहिराती लावून चांगली कमाई करू शकता.

सर्वात भारी गोष्ट म्हणजे, ॲप बनवण्यासाठी तुम्हाला कोडिंग शिकण्याची काहीही गरज नाही.

असे कितीतरी मार्ग आहेत Ai च्या मदतीने पैसे कमावण्याचे. मी पूर्ण विश्वासाने सांगतो, जर तुम्ही तुमच्या डोक्याचा चांगला वापर केला ना, तर तुम्ही नक्कीच Ai च्या मदतीने ऑनलाईन घरबसल्या कमाई करू शकता.

Ai मुळे  नोकऱ्या जाणार का?

या प्रश्नाने सध्या सर्वांना ग्रासले आहे. कारण Ai आता एवढा पावरफुल आणि स्मार्ट झालाय की तो मानवी श्रमाची सर्व कामे सहज करू शकतो. म्हणूनच प्रत्येक नोकरी करणाऱ्या माणसाच्या मनात शंका आहे की, “Ai मुळे आपली नोकरी जाणार तर नाही ना?”

तर याचे सरळ आणि स्पष्ट उत्तर आहे: हो, काही नोकऱ्या नक्कीच जातील, पण सर्व नाही!

Lokmat च्या एका अहवालानुसार, गेल्या वर्षी म्हणजेच २०२५ मध्ये Ai च्या वाढत्या वापरामुळे जगभरात सुमारे १.२ लाख टेक जॉब्स कमी झाले आहेत. हे सत्य नाकारता येणार नाही. पण Ai मुळे काही जुन्या पद्धतीच्या नोकऱ्या कमी होत असल्या तरी, त्यापेक्षा कितीतरी पटीने नवीन संधी, नवीन मार्ग उपलब्ध होत आहेत.

LatestLY Marathi च्या एका लेखात म्हटल्याप्रमाणे, Ai मुळे काही ठराविक क्षेत्रातील जॉब्स कमी होतील, पण त्यापेक्षा जास्त नवीन जॉब्स तयार होतील.

आत्ता आणि भविष्यात या नवीन कामांना खूप मागणी असणार आहे:

  • AI ऑपरेटर: Ai टूल्सकडून काम करून घेणारे लोक.
  • Prompt रायटर: Ai कडून अचूक रिझल्ट मिळवण्यासाठी कडक ‘प्रॉम्प्ट्स’ लिहिणारे एक्सपर्ट.
  • AI डेव्हलपर: नवीन Ai सिस्टिम्स बनवणारे इंजिनिअर्स.
  • AI कंटेंट क्रिएटर: Ai च्या मदतीने दर्जेदार व्हिडिओ, गाणी आणि लेख बनवणारे लोकं.

Ai मुळे बिजनेस करण्याच्या सुद्धा कित्येक नवीन संधी येत आहेत. थोडक्यात सांगायचे तर, Ai मुळे जुन्या नोकऱ्या कमी होतील, पण नवीन नोकऱ्या जास्त प्रमाणात येतील.

महत्त्वाची टीप: Ai शिका! कारण लक्षात ठेवा—Ai तुमची नोकरी घेणार नाही, पण Ai वापरणारा एखादा हुशार माणूस तुमची नोकरी नक्कीच घेऊ शकतो.

Ai मुळे होणारे फायदे आणि नुकसान

हे बघा प्रत्येक नाण्याचे जसे दोन बाजू असतात तसेच  Ai चे फायदे आहेत  तर नुकसान देखील आहे.

चला तर आपण Ai मुळे होणारे फायदे व नुकसान दोन्ही बघूया

AI चे फायदे:
१. वेळेची बचत
: जे काम करायला पहिले तीन-चार तास लागायचे, ते आता Ai मुळे काही मिनिटांत होतं. उदाहरणार्थ—एखादा रिपोर्ट बनवणे किंवा ईमेल लिहिणे.
२. नवनवीन क्रिएटिव्ह आयडिया: जर तुम्हाला काही सुचत नसेल की काय लिहावे किंवा काय बनवावे, तर Ai तुम्हाला एका सेकंदात १०० आयडिया देऊ शकतो.
३. २४/७ उपलब्ध: Ai कधीही थकत नाही. तुम्ही रात्री दोन वाजता जरी काही विचारलं, तरी तो योग्य असं उत्तर देईल.
४. शिकायला मदत: Ai अभ्यास करायला खूप मदत करतो. तो कठीण विषयांना सोपं करून समजावून सांगू शकतो.

AI चे नुकसान:
१. चुकीची माहिती:
कधीकधी Ai खूप आत्मविश्वासाने चुकीची माहिती देऊ शकतो. त्यामुळे त्याने दिलेल्या माहितीची खात्री करणे नेहमी गरजेचे असते.
२. आपला आळस वाढणे: प्रत्येक गोष्टीसाठी किंवा प्रत्येक निर्णय घेण्यासाठी Ai वर अवलंबून राहिल्यामुळे माणसाची स्वतःची विचार करण्याची ताकद कमी होते आणि माणूस आळशी होऊ शकतो.
३. प्रायव्हसी आणि सुरक्षा: Ai ला दिलेली आपली माहिती सुरक्षित राहील याची खात्री देता येत नाही. आपली माहिती चोरी होऊ शकते किंवा तिचा गैरवापरही होऊ शकतो.
४. भावनांचा अभाव: Ai ला आपल्या मानवी भावना समजत नाहीत. जिथे सहानुभूती किंवा नात्यांचा विचार करावा लागतो, तिथे Ai फेल ठरतो.

FAQ

प्रश्न १: २०२६ मध्ये सर्वात चांगला आणि फ्री Ai कोणता आहे?

उत्तर: सध्या २०२६ मध्ये Google Gemini, ChatGPT (Free version) आणि Microsoft Copilot हे सर्वात लोकप्रिय आणि शक्तिशाली फ्री Ai टूल्स आहेत. हे तिन्ही मोबाईलवर ॲपच्या स्वरूपात सहज उपलब्ध आहेत.

प्रश्न २: मोबाईलमध्ये Ai वापरणे सुरक्षित आहे का?

उत्तर: हो, जर तुम्ही अधिकृत ॲप्स (Play Store/App Store) वापरत असाल, तर ते पूर्णपणे सुरक्षित आहे. फक्त कोणत्याही अनोळखी किंवा ‘Third-party’ वेबसाईटवर आपली वैयक्तिक माहिती किंवा बँक डिटेल्स शेअर करू नका.

प्रश्न ३: Ai वापरून घरबसल्या पैसे कसे कमवायचे?

उत्तर: तुम्ही Ai च्या मदतीने फ्रीलान्सिंग (डिझाइनिंग, कंटेंट रायटिंग), यूट्यूब चॅनेल चालवणे किंवा छोटे ‘Mini Apps’ बनवून घरबसल्या पैसे कमवू शकता. यासाठी तुम्ही Canva, ChatGPT किंवा Replit सारख्या टूल्सचा वापर करू शकता.

प्रश्न ४: Ai शिकण्यासाठी कोणती डिग्री लागते का?

उत्तर: मुळीच नाही! Ai वापरण्यासाठी किंवा शिकण्यासाठी कोणत्याही खास डिग्रीची गरज नाही. तुम्ही इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या फ्री कोर्सेस आणि युट्युब व्हिडिओंच्या मदतीने सहज Ai मास्टर बनू शकता.

प्रश्न ५: मोबाईलवर Ai कसा वापरायचा?

उत्तर: तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये Google Gemini किंवा ChatGPT चे अधिकृत ॲप डाउनलोड करून थेट संवाद साधू शकता. तसेच, गुगल सर्चमध्ये ‘Gemini’ फिचर वापरून तुम्ही बोलून तुमचे प्रश्न विचारू शकता.“

निष्कर्ष

तुम्ही जर माझा हा लेख इथपर्यंत वाचला असेल, तर आता तुम्हाला Ai म्हणजे काय हे पूर्णपणे कळलं असेल. त्यासोबतच Ai बद्दलच्या काही महत्त्वाच्या आणि चर्चेत असणाऱ्या प्रश्नांची उत्तरंही तुम्हाला मिळाली असतील.

माझं एकच म्हणणं आहे की, Ai ला आपला एक ‘स्मार्ट मित्र’ माना किंवा तुम्हाला जे योग्य वाटेल ते समजा, पण त्याच्या मदतीने आपल्या वेळेची बचत करा. Ai मुळे आपला जास्तीत जास्त फायदा कसा होईल, याकडे लक्ष द्या. Ai च्या मदतीने तुम्ही तुमचं करिअर सुद्धा घडवू शकता.

तुमचं Ai बद्दल काय मत आहे, ते खाली कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि हा लेख आपल्या मित्रांना पण शेअर करा, जेणेकरून त्यांनाही Ai बद्दलची ही महत्त्वाची माहिती मिळेल!

Leave a Comment